क्रेझी बॉईजचा परवाना रद्द

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल येथील क्रेझी बॉईज या लेडीज सर्व्हिस बारचा परवाना रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. पनवेल आणि नवी मुंबईतील लेडीज ऑर्केस्ट्रा आणि सर्व्हिस बारच्या नावाखाली डान्सबार चालविणाऱ्या व्यावसायिकांना हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सर्वाधिक लेडीज ऑर्केस्ट्रा आणि सर्व्हिस बार आहेत. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या बारमध्ये महिला वेटर नृत्य करतात. त्यावेळी पैशांची उधळण केली जाते. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सर्वच पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नियमबाह्य कृती व्यवस्थापनाविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तरी ही नवी मुंबईतील बार संस्कृतीला वेसण घालण्यात पोलीस असमर्थ ठरले. यामुळे आयुक्तांनी या बारवर अंकुश राहण्यासाठी वेगवेगळ्या हद्दीतील पोलिसांच्या पथकांद्वारे कारवाईचे सत्र सुरू केले. संबंधित परवाना धारकांनी या आदेशाविरोधात शासनाकडे अपील केल्यानंतर राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिवांनी सुनावणी घेतली. प्रधान सचिवांनी संबंधित बारचे परवानाधारकाचे अपील फेटाळत नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी मागील वर्षी क्रेझी बॉईज रेस्टॉरंट ॲण्ड बार आस्थापनेचा ऑर्केस्ट्रा परवाना रद्दचे आदेश कायम ठेवण्यात आल्याचा निर्णय दिला. याबाबत नवी मुंबईचे साहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांनी यापुढेसुद्धा नवी मुंबईत बार आस्थापनांमध्ये होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनाबाबत कडक कारवाई पोलीस पथकांकडून सुरू ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

Exit mobile version