शमी, बुमराह टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार

लंडन | वृत्तसंस्था |
इंग्लंडमधील ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाने यजमान इंग्लंडला 151 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.तळचे फलंदाज असलेल्या मोहम्मद शमी आणि जसप्रित बुमराह या जोडीने केलेल्या 91 धावांच्या भागीदारीमुळे भारताचा विजयाच विजयाचा मार्ग सुकर झाला.तेच या विजयाचे खरे शिल्पकार ठरले.
. लॉर्ड्सच्या मैदानात कर्णधार विराट कोहलीला मोठी खेळी करता आली नसली तरी एक खास रेकॉर्ड त्याच्या नावे झालाय. भारतीय क्रिकेट संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कपिल देव आणि टीम इंडियाला आयसीसीच्या सर्व ट्रॉफ्या जिंकून जिंकणार्‍या महेंद्र सिंह धोनीनंतर लॉर्ड्सच्या मैदानात कसोटी सामना जिंकणारा कोहली भारतीय संघाचा तिसरा कर्णधार ठरलाय.
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भारतीय संघाने 1986 मध्ये या मैदानात भारतीय संघाने विजय नोंदवला होता. त्यानंतर 2014 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने लॉर्ड्सचे मैदान मारले होते. त्यानंतर आता किंग कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दिमाखदार विजय नोंदवलाय.


कोहलीचा विक्रम
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 37 वा कसोटी सामना जिंकलाय. हा एक विक्रमच आहे. विराट कोहलीने वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्णधार क्लाइव लॉइड यांचा विक्रम त्याने मागे टाकला. क्रिकेट जगतात सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम हा दक्षिण आफ्रिकेच्या ग्रँहम स्मिथच्या नावे आहे. त्याच्या नेतृत्वाखालील 109 सामन्यात आफ्रिकेने 53 सामने जिंकले आहेत. 29 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभव स्विकारावा लागलाय तर 27 सामने अनिर्णित राहिले आहेत.

Exit mobile version