जुवे गावाला खाडीच्या पाण्याचा धोका

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

रत्नागिरी शहराजवळील जुवे गावात मुसळधार पावसामुळे खाडीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे जर मुसळधार पाऊस पडला तर जुवे गाव जलमय होऊन नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

जुवे गावामध्ये सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभोवताली व बंधारा तंतोतंत पाण्याने भरलेला आहे. असाच जर पाऊस पडत राहिला पावसाचे पाणी, समुद्राचे भरतीचे पाणी एकत्र येऊन या पाण्याने संपूर्ण जुवे गाव जलमय होऊ शकते, प्रत्येकाच्या घरात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होऊ शकते. त्यावेळी ग्रामस्थांनी जुवे गाव सोडून कुठे जायचे? कसे जायचे? कुठे जायला वाव नाही आहे. या स्थितीमध्ये जुवे गावामध्ये भेट देऊन तसेच शहानिशा करून प्रलंबित कामे पूर्ण करून द्यावीत, असे निवेदन संतोष चव्हाण यांनी सर्व शासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी, मामलेदार, तलाठी व आमदार, खासदार, पालकमंत्री यांना दिले आहे.

Exit mobile version