क्रिकेटवेडा सुपरस्टार!

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बॉलिवूड अभिनेता दिलीप कुमार यांचे बुधवारी (7 जुलै) सकाळी साडेसात वाजता निधन झाले. ते काही काळ आजारी होते आणि त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केवळ सिनेमाच नव्हे, तर दिलीप कुमार यांना क्रिकेटचेही वेड होते. जेव्हा त्यांना संधी मिळत होती, तेव्हा ते क्रिकेटच्या मैदानावर पोहोचत असे. दिलीप कुमार अशाच एका संस्मरणीय क्रिकेट सामन्याचा भाग झाले होते. हा सामना 1962 मध्ये झाला होता. दिलीप कुमार आणि राज कपूर हे दोन दिग्गज मैत्रीपूर्ण सामन्यात आमनेसामने आले होते. सिनेमा कामगारांसाठी निधी गोळा करणे हा या सामन्याचा उद्देश होता.

दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्यात चांगली मैत्री होती. या दोघांचे बालपण पेशावरमध्ये गेले. मुंबईत येऊन दिलीप कुमार सुपरस्टार बनल्यानंतरही त्यांच्या मैत्रीत काही फरक पडला नाही. 1962मध्ये झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यातही त्यांची मैत्री पाहायला मिळाली. हा सामना राज कपूर यांच्या टीमने जिंकला, परंतु दिलीप कुमार आपल्या मित्राच्या विजयामुळे खूश होते. त्याच्या चेहर्‍यावर पराभवाचा कोणताही खेद नव्हता. या सामन्यात दिलीप कुमार यांनी राज कपूर यांच्या गोलंदाजीवर शानदार चौकार ठोकले होते.

Exit mobile version