क्रिकेटची सुरक्षा वाऱ्यावर

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सहावा सामना सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगला. हा सामना आरसीबीने 4 विकेटने जिंकला. परंतु या सामन्यात एक घोडचूक झाली. या सामन्यात पंजाब किंग्सने 177 धावांचे टारगेट आरसीबीला दिले होते. हे टारगेट आरसीबीने सहा गडी गमावून पूर्ण केले. परंतु जेव्हा विराट कोहली फलंदाजी करत होतो, त्यावेळी सुरक्षा व्यवस्थेत एक मोठी चूक झाली. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एक प्रेक्षक सरळ मैदानात घुसला. तो विराट कोहलीजवळ गेला. त्याचे पाय पकडले. त्यानंतर त्याला मिठी मारली. त्यानंतर खेळाडू आणि सुरक्षा रक्षक धावत आले. त्यांनी त्याला पकडून बाहेर काढले.

कोहलीजवळ पोहचला चाहता
जानेवारी महिन्यात अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात असाच काही प्रकार घडला होता. अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी सामन्यात विराट कोहलीचा एक चाहता सरळ मैदानात घुसला होता. त्याने विराटला मिठी मारली होती. त्यावेळी विराट क्षेत्ररक्षण करत होता. आता दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. यामुळे आयपीएल आणि खेळाडूंच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे.
कुत्रा घुसला मैदानात
रविवारी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स सामन्यात एक कुत्रा मैदानात घुसला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा प्रकार घडला होता. सामन्यात एका कुत्र्याने घुसखोरी करुन स्टेडियमधील प्रेक्षकांना हसवले होते. गुजरातची फलंदाजी सुरु असताना 15व्या षटकात हा प्रकार घडला होता. त्या कुत्र्यानेही सर्व सुरक्षा व्यवस्थेला चकवा दिला होता. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांची तारांबळ उडाली. या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न समोर येऊ लागला आहे.
Exit mobile version