| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत ‘अ’ संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून तिथे सुरू असलेल्या त्रिकोणी मालिकेतील चौथा सामना आज भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यात खेळला जात आहे. या मालिकेत आतापर्यंत तिन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकला असल्याने स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे. या सामन्यात सगळ्यांचे लक्ष 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीवर होते. मात्र, आक्रमक सुरुवात करूनही त्याला मोठी खेळी करता आली नाही. वैभव सूर्यवंशीसाठी हा दौरा संमिश्र ठरला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंका ‘अ’ विरुद्ध त्याला केवळ 14 धावा करता आल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तान अ विरुद्धच्या सामन्यात त्याने 44 धावांची आक्रमक खेळी करत आपली छाप पाडली होती. मात्र, आज पुन्हा श्रीलंका ‘अ’ विरुद्धच्या सामन्यात त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याने 12 चेंडूत 14 धावा करत चांगली सुरुवात केली, पण त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. या सामन्यात श्रीलंका ‘अ’ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंग यांनी डावाची सुरुवात केली. वैभवने काही आकर्षक फटके खेळत आक्रमक अंदाज दाखवला, मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. भारताचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी 21 धावांवर बाद झाला. श्रीलंकेचा फिरकीपटू सहान अराचचिगेच्या ऑफ-स्टंपबाहेरील चेंडूवर मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात वैभव चकवला. त्याच्या बॅटची बाहेरील कडा घेऊन चेंडू पॉईंट क्षेत्रात हवेत उडाला, जिथे वणुजा सहानने त्याचा सोपा झेल घेतला.






