| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील पीएमश्री म्हणून निवड झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ या शाळेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (दि.15) भेट दिली. यावेळी त्यांनी पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तसेच, शाळेत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सेंटर लॅबचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
वहाळ शाळेत झालेल्या प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रधान सचिव शालेय शिक्षण रणजीत सिंह देओल, आयुक्त शालेय शिक्षण सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त कोकण रुबल अग्रवाल, आ. विक्रांत पाटील, आ. प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, दुग्ध व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा परिषद सदस्य कमला देशेकर, अनन्या गाताडे, प्राची जाधव, हर्षदा घरत, निकिता खारकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महारूद्र नाळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांच्यासह इतर मान्यवर, पालक उपस्थित होते.
अनेक अधिकाऱ्यांची शाळांना भेट
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अलिबाग तालुक्यातील नवगाव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांनी पनवेल तालुक्यातील पळस्पे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी बुद्रुक या जिल्हा परिषद शाळांना भेट देत विद्यार्थी व पालकांसोबत संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे महत्व पटवून देण्यात आले.
उन्हाळी सुुट्टीनंतर पुन्हा नव्याने शाळा सुरु झाल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बैलगाडीला सजवून त्यामधून मिरवणुक काढत मुलांना शाळेपर्यंत आणण्यात आले. त्यानंतर फुलांचा वर्षाव करीत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षणप्रेमी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, शुज वाटप केले. पहिल्या दिवशी शालेय पोषण आहार व गोड पदार्थ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रमोद भोपी,
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा अलिबाग







