सावळे येथे क्रिकेट स्पर्धा

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सावळे येथे शिवसेना विभागप्रमुख चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यानुसार यावर्षी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धा विभागप्रमुख चषक – 2002 चे आयोजन करण्यात आले आहे. सावळे येथील मैदानावर शिवसेना विभागप्रमुख क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले विभागप्रमुख बाजीराव दळवी करीत असतात.यावेळी पाहुण्यांचे हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेना विभाग प्रमुख क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली.

त्यावेळी छत्रपती शिवाजी महाऱाज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन झाल्यावर आयोजक विभागप्रमुख बाजीराव दळवी यांचे हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेला सुरुवात झाली. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख रामदास घरत,तरुण कुमार मिश्रा,भास्कर देसले,प्रसाद थोरवे,रामचंद्र मिणमिने,हृषीकेश राणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.आठ डिसेंबरपर्यंत या क्रिकेट स्पर्धेचे नियोजन असून 32 संघांमध्ये बाद पद्धतीने ही स्पधार्र् जाणार आहे.

Exit mobile version