। अलिबाग । प्रतिनिधी ।
माणकेश्वर, कोळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सभापती दिलीप भोईर. सासवणे सरपंच संतोष गावंड, अशोक म्हात्रे, चंद्रकांत म्हात्रे आदींसह युवा नेते युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य, शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या स्पर्धेत 32 संघ सहभागी झालेले आहेत.
