झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धा

फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव विजयी


| पोयनाड | प्रतिनिधी |

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रवींद्र चवरकर स्मृतीचषक एकदिवसीय 40 षटकांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात फायटर्स क्रिकेट अकॅडमी माणगाव संघांनी पोयनाड संघावर 31 धावांनी विजय मिळवला आहे.नाणेफेकीचा कौल जिंकून फायटर्स माणगाव संघांनी प्रथम फलंदाजी स्विकारली सलामीवीर फलंदाज आकाश चौधरी यांनी सुरेख फलंदाजी करत 29 धावा काढल्या त्याला दुसऱ्या बाजूने पारस माळी 24 रीत जैन 28 पार्थ मस्के यांनी 22 धावा केल्या.

पोयनाड संघाकडून अजिंक्य कैया,गौरांश सिंगला,वैष्णवी जाधव यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले.प्रतिउत्तर देतांना पोयनाड संघाकडून विराज पाटील यांनी सर्वाधिक 83 धावा काढून एकाकी झुंज दिली.माणगाव संघाकडून अजय जाधव व पार्थ मस्के यांनी प्रत्येकी 3 फलंदाजांना तंबूत धाडले.फायटर्स माणगाव संघाचा जलदगती गोलंदाज अजय जाधव याला सामनावीर,स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू विराज पाटील,इमॅर्जिंग प्लेयर वैष्णवी जाधव,उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून रिषभ माळी,अब्दुल मनान तुंगेकर यांना झुंझारचे सचिव किशोर तावडे,अजय टेमकर,झरार तुंगेकर,संदिप जोशी,रोहित काळे,प्रतिक मोहिते,आदेश नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version