| मेरठ | वृत्तसंस्था |
भारतीय संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमारचा मेरठ शहरात कारमधून जात असताना अपघात झाला. त्याच्या कारला भरधाव वेगाने येणार्या कंटेनरने धडक दिली. त्यावेळी प्रवीणसोबत त्यांचा मुलगाही कारमध्ये होता आणि दोघेही या अपघातातून थोडक्यात बचावले. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी कंटेनर चालकाला घटनास्थळावरून ताब्यात घेतले. प्रवीण कुमार मेरठमधील पांडव नगर येथून त्याच्या लँड रोव्हर डिफेंडर कारने येत होता. यानंतर त्याची कार आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले असता, त्याचवेळी त्याच्या कारला कंटेनरची धडक बसली. यानंतर गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघातात प्रवीण आणि त्याचा मुलगा थोडक्यात बचावले. अपघातानंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. या अपघाताबाबत सीओने सांगितले की, प्रवीण कुमार आणि मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्रवीण कुमार यांचे घर मेरठ शहरातील बागपत रोडवर असलेल्या मुलतान नगरमध्ये आहे.