| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चौघा विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. इरफान शेख बकरी ईद असल्याने सलमान शेख, राजू शेख यामध्ये बकर्यांची कुर्बानी देऊन त्यातून मिळणारे पैसे वाटून घेण्याचे ठरवले. त्यांनी सहा बकर्यांना कुर्बानी दिली. त्यांना पंधरा हजार रुपये आले. त्यातील दोन हजार रुपये रशीद याला दिले. उरलेले 13 हजार रुपये इरफान, राजू शेख, सलमान शेख यांच्यामध्ये वाटून घेण्याचे ठरवून इरफानला साडेचार हजार, सलमानला साडेचार हजार आणि राजू शेखला चार हजार रुपये वाटून घेऊ असे ठरले. सलमान मी पाच हजार रुपये घेणार असे म्हणाला. त्याच्याशी वाद झाला. त्यानंतर तो शिवीगाळ करून निघून गेला. सलमान इरफानच्या घरी आला आणि जुगारात पैसे हरल्याचे सांगून कुर्बानीच्या वाटणीचे पाच हजार रुपये दे असे सांगितले. त्याला पाच हजार रुपये दिल्याने तो निघून गेला. सलमान मित्रांबरोबर उभा असताना खूप नुकसान झाले दुसरीकडे बकर्या कुर्बानीसाठी दिल्या असत्या तर जास्त पैसे मिळाले असते असे बोलला. इरफानने तुझ्या वाटणीचे पैसे दिले असल्याने आता बोलू नको असे सांगितले. यावेळी सलमानने भाऊ सलीम, रहमान, अरबाज यांना बोलावून घेतले आणि त्यांनी इरफान याला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण करून डोक्यात दगड मारला.







