| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल येथे रामनवमी आयोजक आणि शांतता कमिटी सदस्यांची संयुक्त बैठक (दि.24) मार्च रोजी मंथन हॉल येथे घेण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल, भाऊसाहेब ढोले यांनी मार्गदर्शनपर सूचना केल्या. पालखी मिरवणूक दरम्यान वाहतुकीस अडथळा होणार नाही. यावेळी गर्दी व्यवस्थापन करून स्वयंसेवक नेमावे. ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण नियमावली 2000 चे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रशासनाशी समन्वय साधावा. कोणत्याही प्रकारचे प्रक्षोभक घोषणा, आक्षेपार्ह बॅनर, आणि पोस्टर लावू नयेत. नवी मुंबई व्हाट्सअप बाबत माहिती देऊन फॉलो करण्याबाबत सूचित करण्यात आले. यावेळी सायबर फ्रॉड बाबत थोडक्यात माहिती दिली. तसेच अमली पदार्थांचे दुष्परिणाम व हेल्पलाइनची माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान वापरण्यात येणाऱ्या लेझर लाईटचा वैमानीकांना त्रास होत असून लेझर लाईट न वापरण्याचे सूचित करण्यात आले. या बैठकीला खांदेश्वर पोलीस ठाण्याचे स्मिता ढाकणे, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे गजानन घाडगे, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे नितीन ठाकरे, अभिजीत अभंग उपस्थित होते.





