| कोलाड | प्रतिनिधी |
गुरुवार दि. 18 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.45 वाजण्याच्या सुमारास आंबेवाडी गावा नजिक असणाऱ्या गोदी नदीत भरदिवसा सदर आरोपी यांनी संगमत करून ट्रॅक्टर क्र. एम. एच.04 बी. यु.2667 यामधून दूषित सांडपाणी हे सुरक्षित ठिकाणी न पोहचविता जाणीवपूर्वक नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होईल या उद्देशाने गोदी नदी सोडल्यामुळे सदरचे पाणी मनुष्य व प्राणी यांच्या जीवाला हानिकारक असल्याची माहिती असून देखील रोगाचा संसर्ग पसरण्याची घातक कृती केल्यामुळे तिघाजनांवर कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्या संदर्भात आरोपी सुभाष सिताराम भोसले (50), सोनु गुनेश्वर वर्मा (23) तसेच मोंटू कुमार यादव (23) यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असुन अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार एस एस अधिकारी करीत आहेत.







