धमकी प्रकरणी गुन्हा

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल व उरण भागातील दगडखाणींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दगडखाण व्यावसायिकांना धमकावून त्यांच्यावर दबाव आणणार्‍या स्वराज्य स्टोन एलएलपी कंपनीच्या संचालकांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. दगडखाण मालकांवर स्वराज्य स्टोन एलएलपी या कंपनीसोबत जबरदस्तीने करारनामा करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दबाव आणण्यात येत होता. तसेच त्यांच्या क्रशर फ्लान्टवर जाऊन त्यांच्या कामगारांना मारहाण करून दगडखाण मालकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात असल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version