पनवेलमध्ये गोवंश मांस वाहतूकप्रकरणी गुन्हा

। पनवेल । प्रतिनिधी ।

गोवंश मांसाची वाहतूक केल्याप्रकरणी पिकअप चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोनगाव येथे पांढर्‍या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअपमधून जवळपास एक हजार किलो वजनाचे गोवंश मांस विक्रीसाठी घेऊन जाताना पोलिसांना आढळले. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालकावर गुन्हा दाखल करून पिकअप तसेच गोवंश मांस हस्तगत केले. एकूण पिकअप गाडीसह 7 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Exit mobile version