चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल शहरातील ओरियन मॉलच्या मागे असलेल्या संत फ्रान्सिस झेवियर चर्च येथे झालेल्या चोरीमध्ये तेथील दानपेटी फोडून अंदाजे 50 हजार रुपये तसेच, लाईन आळी येथील सेंट फ्रान्सिस न्यू चर्चचा पाठीमागील दरवाजा तोडून तेथील कपाटात असलेल्या दान पेटीतील रोख रक्कम 5 हजार रुपये चोरुन नेण्यात आली होती. याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पो.हवा. नितीन वाघमारे, परेश म्हात्रे, पो.ना.विनोद देशमुख आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे सराईत आरोपी अग्र धनबहाद्दुर बिष्ट उर्फ पवन व धनबिरे राहुले विसुक्रमा या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे अधिक तपासात हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत.

Exit mobile version