दागिने चोरणारा सराईत गुन्हेगार गजाआड

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल एस.टी.स्टँण्ड आवारात घाईघाईमध्ये बसमध्ये चढणार्‍या प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन किंवा महिलांच्या हातातील बांगड्या सराईतपणे चोरणार्‍या एका गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गेल्या काही महिन्यामध्ये पनवेल एस.टी.आवारात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली होती व याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. विनोद लभडे, पोहवा नितीन वाघमारे, पोहवा अविनाश गंथडे, पोहवा अमोल डोईफोडे, पोहवा परेश म्हात्रे, पोहवा महेंद्र वायकर, पोहवा संदेश म्हात्रे, पोना विनोद देशमुख, पोशि चंद्रशेखर चौधरी आदींचे पथक या गुन्हेगाराचा शोध घेत असताना तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस हवालदार परेश म्हात्रे यांना सराईत गुन्हेगार जॉर्ज शेट्टी (40) रा.वडारपाडा, अंबरनाथ याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेवून त्याच्याकडून आतापर्यंत दिड लाखापर्यंत चोरीचे दागिने हस्तगत केले आहेत. तर त्याचे दोन साथीदार पसार असून त्यांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version