पनवेल शहर पोलिसांनी 24 तासात लावला शोध
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल रेल्वे ठाण्याच्या परिसरातून तीन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणार्या आरोपीला 24 तासात पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर बाळ नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेरुन तीन महिन्यांच्या बाळाचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले म्हणून पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा प्रकार हा संवेदनशील व गंभीर स्वरुपाचा असल्याने तात्काळ यातील अपहृत बाळ व आरोपीचा शोध घेणेकामी पनवेल शहर पोलीस ठाण्याकडून 5 पथके तयार करण्यात आली. सदर पथकाने पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक महिला ही यातील अपहृत बाळासह पुण्याच्या दिशेने जाणार्या रेल्वेमध्ये बसताना दिसून आली. त्यावरुन सदर आरोपी व अपहृत बाळाचा शोध घेणेकामी कर्जत, लोणावळा, दौंड, पुणे येथे पथके रवाना केली.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई संजय ऐनपुरे, पोलीस सह आयुक्त नवी मुंबई प्रशांत मोहीते, पोलीस उपायुक्त सो, परि 02, पनवेल, नवी मुंबई; अशोक राजपुत, मा. सहा. पोलीस आयुक्त सो, पनवेल विभाग, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, पोनि (गुन्हे) शाकीर पटेल, पोनि (प्रशा) अभिजीत अभंग, सपोनि प्रकाश पवार, सपोनि तृप्ती शेळके (नेम- कळंबोली पोलीस ठाणे), पोउपनि विनोद लभडे, पोउपनि अंकुर शेलार, पोउपनि उद्धव सोळंके, पोहवा महेंद्र वायकर, पोहवा अमोल डोईफोडे, पोहवा गंथडे, पोहवा अमोल पाटील, पोहवा बोरसे, पोहवा महेश पाटील, पोशि किरण कराड, पोशि विशाल दुधे, पोशि नितीन कांबळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.