| पोलादपूर | प्रतिनिधी |
ग्रामीण रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण कक्षाच्या नूतनीकरणाच्या कामाचे लोकार्पण करताना अधिकाधिक बाह्यरूग्णांना याचा लाभ व्हावा आणि डॉक्टर मंडळींनी ग्रामीण भागातील रूग्णांवर उपचार करून सहकार्य करण्याची अपेक्षा रोहयो, खारलँड व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली.
पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण कक्षाचे नूतनीकरणाचे सुमारे 1 कोटी रूपये खर्चाचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर मंत्री गोगावले यांच्या हस्ते पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण कक्ष नूतनीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ना. गोगावले बोलत होते. यावेळी ना. गोगावले आणि नगराध्यक्षा शिल्पा दरेकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख निलेश अहिरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिलेल्या एलसीडी टीव्हीसेटचे कौतुकही ना. गोगावले यांनी केले.
यावेळी मंत्री गोगावले यांच्यासोबत माजी राजिप उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश अहिरे, तहसिलदार कपिल घोरपडे, सपोनि आनंद रावडे, गटविकास अधिकारी दिप्ती गाट, नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, सभापती सिध्देश शेठ, उद्योजक रामदास कळंबे, कृउबाचे संचालक लक्ष्मण मोरे, सिध्दीविनायक सोसायटीचे दत्ता मोरे आणि ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील, डॉ.राजेश सलागरे, डॉ. राजेश शिंदे, परिचारिका स्वप्नाली गांधी, पवार सिस्टर तसेच आरोग्य कर्मचारी व स्टाफ उपस्थित होता.