सराईत गुन्हेगारास अटक

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात उभ्या करून ठेवलेल्या मोटार सायकली चोरणार्‍या एका सराईत चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून आतापर्यंत तीन मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. या गुन्ह्यातील आरोपी मलिक शेख (रा.पेठ गाव) याचा या गुन्ह्यात सहभाग आहे. त्यानुसार त्याला सापळा रचून अटक केली असता त्याने पनवेल विश्रामगृहाजवळ उभी करून ठेवलेली होंडा अ‍ॅक्टीव्हा 5 जी स्कूटर ही चोरल्याचे कबुल केले. त्याचप्रमाणे होंडा कंपनीची अ‍ॅक्टीव्हा व बजाज कंपनीची पल्सर अशी तीन वाहने पनवेल परिसरातून चोरल्याचे कबूल करून त्याची किंमत जवळपास 1 लाख 45 हजार रुपये इतकी आहे. याच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अनेक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version