| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलिसांच्या कोम्बिंग कारवाई दरम्यान एका सराईत गुन्हेगारास पनवेल रेल्वेस्टेशन जवळील नवनाथ मंदिर मालधक्का झोपडपट्टी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी इजाज शेख उर्फ अज्जू याने त्या परिसरात चहा टपरीवर चहा पिण्याकरिता थांबलेले महादेव देवकांबळे (वय 45) यांच्याकडील ओपो कंपनीचा 12,500 रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने ओढून चोरून घेऊन गेला होता व चाकूचा धाक दाखविला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने त्या परिसरात कोम्बिंग कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.







