| पनवेल | वार्ताहर |
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पनवेल मनपा हद्दीतील विकास कामांवर जोरदार टीका करण्यात आली असून या संदर्भात जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या प्रलंबित विकास कामांवर आवाज उठवून सत्ताधार्यांना धारेवर धरले आहे.
या संदर्भात बोलताना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी सांगितले की, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लागून असलेल्या छत्रपती संभाजी महाराज मैदानासाठी 10 कोटीचे टेंडर काढले असून गेली तीन वर्षे काम पूर्ण करण्याचा थांगपत्ता नाही. खारघर शहरातील लिटल वर्ल्ड ते हिरानंदानीपर्यंत चांगला असलेल्या रस्त्याचे पुन्हा टेंडर काढून काम चालू केले आहे. म्हणजे यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. मुर्बी गाव ते सेंट्रल पार्क पर्यतचे रस्ते तसेच गावातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत. याकडे लक्ष नसून, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी फक्त स्वत:च्या फायद्याकरीता ठेकेदारांनासाठी सोयिस्कर धोरणे राबविलीजात आहेत. छत्रपती संभाजी महाराज मैदानामध्ये झाडीझुडपे वाढली आहेत. तरी महानगर पालिकेने याची दखल घ्यावी. आणि नागरिकांना होणार्या त्रासापासून सुरक्षित ठेवावे. नागरिकांच्या जीवाशी खेळू नये असे ठणकावून सांगितले. हा पैसा जनतेचा असून, महानगरपालिकेला त्याची काहीच किंमत नाही. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्र केव्हा खड्डे मुक्त होणार? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. तसेच कर्नाळा स्पोर्टस् समोरील चांगल्या रस्त्याचे कामाचे टेंडर काढले असून पुन्हा रस्त्याचे काम करत आहेत .महानगरपालिकेने याची देखील योग्य ती चौकशी करून दखल घ्यावी, अशी मागणी शिरीष घरत यांनी केली आहे.