वाहनाच्या धडकेत मगरीचा मृत्यू; अधिकार्‍यांची घटनास्थळी भेट

। माणगाव । सलीम शेख ।
माणगाव तालुक्यातील सुतार आळी भागात अज्ञात वाहनाच्या धडकेत मगरीचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-गोवा महामार्गावर रामदेव स्टील सेंटर समोर गुरुवारी (दि.14) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच माणगाव वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन मृत अवस्थेतील मगरीला शव विच्छेदनासाठी माणगाव पशु वैद्यकीय सर्वचिकित्सालय दवाखान्यात नेले.

मुंबई-गोवा महामार्गावरून रस्ता ओलांडून जात असताना एका अज्ञात वाहनाची मगरीला धडक लागली. यामध्ये तिला दुखापत होऊन रस्ता ओलांडल्यावर रस्त्याच्या कडेला काही वेळातच ती मृत पावली.ि ह घटना घडली त्यावेळी माणगाव तालुक्यातील भादाव येथील तरुण युवक शुभम माने हा तेथून जात असताना त्याने पहिली. याबाबत त्याने आयटीआय निजामपूर येथील रुपेश जाधव यांना मिाहिती दिल्यावर त्यांनी वनखात्याला याबाबतची माहिती दिली.

माहिती मिळताच वनखात्याचे वनक्षेत्रपाल अनिरुद्ध ढगे,वनरक्षक अक्षय मोरे,आदेश पोकळ,कल्पना गायकवाड,वैशाली मोरे, वनमजूर नथुराम म्हस्के हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले. हि मगर 1.30 सेमी असून तिचे वजन 20 किलो असल्याची माहिती वनखात्याच्या अधिकार्‍यांनी दिली.

Exit mobile version