नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक

। पुणे । प्रतिनिधी ।

पुण्यात शेअर मार्केटच्या नावाने पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. दोन हजार पेक्षा जास्त गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा तुम्हाला पैसे दुप्पट करून देतो असे सांगून फसवणूक करण्यात येत होती. पैसे मिळताच फर्मचालक फरार झाला आहे. मात्र, याप्रकरणी तक्रार करून देखील पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे.

Exit mobile version