। नागपूर । वृत्तसंस्था ।
निवडणुकीत विजयासाठी सर्वच उमेदवारांकडून पूर्ण ताकद लावण्यात आली असून त्यासाठी प्रचारही जोरात सुरू आहे. उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च करण्यात येत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कोट्यवधींचे चलन बाजारात आले आहे.
निवडणूक विभागाच्या आधारे गेल्या दहा दिवसातच लाखो रुपये विविध खर्चांच्या माध्यमातून बाजार आला आहे. हा घोषित आकडा असला तरी अघोषित आकडा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याची चर्चा आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच उमेदवार प्रयत्नात आहेत. त्यांच्याकडून रोज प्रचार रॅली काढण्यात येत असून सभाही घेण्यात येत आहेत. यावर खर्चही होत आहे. नुकतीच उमेदवारांनी खर्चाची माहिती निवडणूक विभागाला सादर केली. उमेदवारांनी दाखवलेला खर्च व निवडणूक विभागाच्या मते झालेला खर्च यात तफावत आहे.
निवडणूक विभागाचा विचार केल्यास उमेदवारांकडून जवळपास एक कोटी रुपये खर्च करण्यात आले. यात भाजप, काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. इतरही उमेदवारांकडून खर्च करण्यात येत आहे. अधिकृतरीत्या खर्चाची रक्कम एक कोटीच्या जवळपास असली तर अनधिकृतपणे खर्चाची रक्कम यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याची चर्चा होत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून कोट्यवधींचे चलन बाजारात आल्याचे दिसते. प्रचारासाठी उमेदवारांकडून बॅनरचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या व्यवसायाला निवडणुकीच्या काळात या व्यवसायाला अच्छे दिन आले आहेत.