| आगरदांडा | प्रतिनिधी |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणुकीकरिता मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदान करताना मतदार यांनी कुठल्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करावे व निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी भारत निवडणूक आयोग यांचे व जिल्हाधिकारी रायगड यांच्या, मार्गदर्शनाखाली शहरात स्वीप कार्यक्रम राबविण्याचे आयोजन करण्यात आले. त्याच अनुषंगाने मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा व सफाई कर्मचारी यांनी सायकलला जनजागृतीपर संदेश लावून शहरात सायकल रॅली काढण्यात आली.
यावेळी मुरूड जंजिरा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज अनिल भुसे, लेखापाल कपिल वेहेले, आरोग्य निरीक्षक राकेश पाटील, प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, लिपीक मनोज पुलेकर, मुकादम अभिजीत चांदारेकर, अभिजीत कारभारी, सिटी को-ऑर्डीनेटर सचिन कोरके, मराठी शाळेचे शिक्षक, शिक्षिका सहभागी झाले होते.