| पनवेल | प्रतिनिधी |
दहावी व बारावीच्या निकालानंतर पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून, विविध दाखल्यांसाठी पनवेल तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र तसेच पुरवठा विभागात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालक सकाळपासून रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून आले. प्रवेशासाठी लागणारे दाखले वेळेत मिळावेत यासाठी अनेक नागरिकांनी तहसील कार्यालयात धाव घेतली. वाढती गर्दी लक्षात घेता संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असून, नागरिकांना शिस्तबद्ध पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दहावी-बारावी निकालानंतर दाखल्यांसाठी तहसील कार्यालयात गर्दी
