| चिरनेर| वार्ताहर |
चिरनेरमध्ये महागणपतीच्या दर्शनासाठी शनिवारी 30 डिसेंबर रोजीच्या संकष्टी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. काही भाविकांनी पायी वारी करीत मंदिर गाठून श्रींचे दर्शन घेतले. रायगडसह नवी मुंबईचे हजारोंच्या संख्येने भाविक येथे दाखल झाले होते. परिसरातील दुकाने ग्राहकांनी गजबजली होती. मंदिर परिसरात फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक आदिवासी व आगरी समाजाच्या महिला विक्रेत्या विक्री करत होत्या. येथे येणारे भाविक येथून आवर्जून रानमेवा खरेदी करत होते. भाविकांच्या सोयीसाठी श्री गणपती देवस्थानतर्फे चोख व्यवस्था करण्यात आली होती.







