। पेण । वार्ताहर ।
पेण पाटणेश्वर येथील श्री क्षेत्र पाटणेश्वर मंदिरातही मंगळवारी महाशिवरात्री साजरा करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. मध्यरात्री 12 वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती. सालाबादप्रमाणे दुपारी 12 च्या सुमारास पाटणोली गावातून भोले बाबाची पालखी काढण्यात आली. ताळ मुदृगांच्या गजरात 2 च्या सुमारास पालखी मंदिरात आणण्यात आली. या पालखी सोहळ्यासाठी पाटणोली गावातील तरूणवर्ग जरी काम निमित्त बाहेर असले तरी ते पालखीसाठी आर्वजून हजर राहून पालखीचा आनंद द्विगुणी करतात.







