| मुंबई | प्रतिनिधी |
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे त्यांच्या वरण भात लोन्चा कोण नाय कोंचा या चित्रपटामुळे वादाच्या भोवर्यात सापडले होते. त्या चित्रपटातील प्रसंग, संवाद आणि भडक चित्रिकरण यामुळे तो चित्रपट वादास कारणीभूत ठरला होता. त्यामुळे त्याच्यावर महिला आयोगासह काही महिला संघटनांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी कोर्टानं त्यांना दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी होईपर्यत कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना कोर्टानं दिले आहेत.






