तीर्थक्षेत्र पाली येथे भाविकांची मांदियाळी

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी पाली येथे शनिवार, रविवार आणि उन्हाळी सुट्ट्यानिमित्त पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले वळतात. पाली येथे बल्लाळेश्‍वर मंदिर, सरसगड, सुधागड किल्ल, उन्हेरे गरम पाण्याचे कुंड, ठाणाळे, गोमाशी लेण्या पाहण्यासाठी पर्यटकांसह शाळकरी व महाविद्यालयीन विदयार्थ्यांचा ओघ प्रचंड आहे.

यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, दुकानदार तसेच, कडक उन्हाळा असल्यामुळे रसवंती गृहे यांची सध्या चलती आहे. यावेळी परिसरातील दुकाने, हॉटेल व लॉज ग्राहकांनी गजबजले होते. येथील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तुंची दुकाने, नारळ, हार, फुले व पापड मिरगुंड, कडधान्य विक्रेते, रानमेवा विक्रेतेहापूस आंबा, पिकलेली करवंद, प्रसाद व पेढेवाले होते. मंदिर परिसरात वर्दळ होती. भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

Exit mobile version