| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रा.जि.प. शाळा गोमाशी येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सुधागड तालुका यांच्यावतीने मोफत शैक्षिणक साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, कंपास पेटी, तसेच खाऊचा समावेश होता. यावेळी मनसे विद्यार्थी सेना सुधागड तालुका अध्यक्ष भावेश बेलोसे, तालुका सचिव तेजस परबलकर, पाली शहर सचिव प्रतिक आंग्रे, भावेश वारंगे, राहुल हुले, सौरभ ठाकूर, करण टक्के, परशुराम वाघमारे, शिक्षक राजेंद्र खैरे, शाळा समिती अध्यक्ष उर्मिला मगर, कुंदा मोहने, कविता मोहिते, योगेश सुतार, पंढरीनाथ जंगम आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.