| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील रा.जि.प. प्राथमिक शाळा धानकान्हेच्या मुख्याध्यापिका वैशाली सलागरे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. दादर मुंबई येथील कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा श्यामसुंदर महाराज आळंदीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड होते. वैशाली सलागरे यांची नुकतीच 2 जुलै रोजी शिक्षकीसेवेची 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारताना त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. त्यांच्या या सन्मानाबद्दल सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे. या पुरस्काराबद्दल देवकान्हे सरपंच वसंत भोईर, उपसरपंच सूरज कचरे, सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व तरूण मंडळ यांनीही अभिनंदन केले आहे.