पालीत भक्तांची मांदियाळी; बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी रांगा

| सुधागड-पाली | वार्ताहर |

अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिकस्थळ असलेल्या पाली शहरात संकष्टी चतुर्थीला शनिवारी (ता.12) बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागल्या होत्या. मंदिर परिसराला जणूकाही यात्रेचे स्वरूप आले होते.

दुसरा शनिवारची सुट्टी असल्याने दर्शनासाठी रायगड जिल्हा, महाराष्ट्रातील विविध भागांसह मुबंई, ठाणे पुणे आदी शहरांतील आणि परराज्यातून भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर पालीत दाखल झाले होते. भाविक व स्थानिकांच्या वाहनांमुळे बल्लाळेश्‍वर मंदिर परिसर, वडेर हायस्कूल, महाकाली मंदिर चौक, बाजारपेठ, गांधी चौक, हाटाळेश्‍वर चौक वाहतूक कोंडी झाली होती. मात्र वाहतूक पोलीस व देवस्थान ट्रस्टचे सुरक्षा रक्षक वाहतूक कोंडी सोडवीत होते.

बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे, उपाध्यक्ष वैभव आपटे, विश्‍वस्त प्रमोद पावगी, अरुण गद्रे, विश्‍वास गद्रे, अमोल साठे आणि डॉ. पिनाकीन कुंटे यांच्या मार्फत भाविकांच्या सोईसाठी बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.

Exit mobile version