। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर महागणपती तीर्थक्षेत्रात नववर्षा निमित्ताने बुधवारी (दि.1) गणेशभक्तांनी प्राचीन श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. पहाटेपासूनच श्रींच्या दर्शनाला सुरुवात झाली होती. यावेळी नववर्षानिमित्ताने श्री महागणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची दिवसभर रीघ लागली होती. नारळ हाराबरोबर गणेश भक्तांनी श्री महागणपतीला पेढे, लाडू व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. उरण तालुक्याबरोबर पनवेल, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, येथील गणेश भक्तांनी श्री महागणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान हार, नारळ, गावठी भाज्या, मातीची भांडी तसेच हॉटेल व्यवसायिकांचा धंदा तेजित असल्याचे दुकानदार प्रणोती पाटील हिने सांगितले.





