पनवेल बस स्थानकात प्रवाशांची गर्दी

| पनवेल | वार्ताहर |

रविवारी रात्री पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावर पाणी साचल्याने पनवेल-सिएसटी मार्ग पुर्णपणे ठप्प झाला असल्याने फक्त वाशीपर्यंत रेल्वे जात होती. यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले असून पनवेल स्थानकात मोठी गर्दी झाली होती.


तसेच, रेल्वेने मुंबईकडे जाणार्‍या प्रवाशांची पावले पनवेल एसटी डेपोकडे वळली होती. दादर, मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढल्याने जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.

Exit mobile version