| उरण । वार्ताहर ।
उरण येथील पिरवाडी समुद्र किनार्यावर रविवारी पर्यटकांनी सुट्टीचा दिवस म्हणून गर्दी केली होती. यावेळी सुरक्षा म्हणून पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता. पिरवाडी समुद्र किनारा हा उरणसह, पनवेल,नवी मुंबई तसेच ठाणे व पेण मधील पर्यटकांसाठी एक दिवसाच्या पर्यटनाचे ठिकाण आहे. त्यामुळे या किनार्यावर या अनेक पर्यटक सुट्टी घालविण्यासाठी येतात. मात्र मागील आठवडा भर पाऊस असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली होती. रविवारी पाच वाजल्यापासून पावसाने विश्रांती घेतल्याने स्थानिक व पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.