| पनवेल । वार्ताहर ।
राज्य उत्पादन शुल्क पनवेल शहर यांनी डिसेंबर 2021 ते ऑगस्ट 2022 पर्यंत अवैध मद्य, मद्य वाहतूक, बेकायदेशीर मद्य विक्री करणरयावर 162 गुन्ह्यांची नोंद केली आहे. याप्रकरणी 22 लाख 77 हजार 123 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये अवैध दारू वाहतूक करणारे एकूण बारा वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच अनुज्ञप्तीवर विभागीय विसंगतीचे एकूण 28 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पनवेल परिसराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकीकरण देखील झपाट्याने वाढू लागले आहे. पार्टी, समारंभ, मेजवानी, लग्न समारंभमध्ये मोठ्या प्रमाणात मद्य पुरविले जाते. यावेळी मद्यपान करणार्याचे प्रमाण देखील भरमसाठ आहे. अशा वेळेला बनावट मद्याचा देखील पुरवठा केला जातो. परराज्यातून मोठया प्रमाणावर बेकायदा मद्य शहरात आणले जाते. या विरोधात उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून बेकायदेशीर मद्य व रसायन विकणार्या विक्रेत्यांवर देखील कारवाई केली आहे.
उघडयावर मदय पिणार्या मद्यपीवर व ढाबा मालकावर गुन्हे नोंद करत त्यांना शिक्षा देखील न्यायालयाने दिली आहे. सध्याच्या विधिमंडळात गाजलेल्या बियर शॉप समोर उघडपणे बियर पिणार्या मद्यपी तसेच बिअर शॉप मालक यांच्यावर गुन्हे नोंद करत त्यामधील एकूण सात बियर शॉपी या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बंद करण्यात आलेल्या आहेत. अपुरे कर्मचार्याअभावी देखील राज्य उत्पादन शुल्क पनवेल विभागाची कारवाईची मोहीम सुरू आहे. नागरिकांना अवैध धंद्याबाबत काही तक्रारी असल्यास त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, निरीक्षक पनवेल शहर यांच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.