शिवज्योत नेण्यासाठी किल्ले रायगडावर गर्दी

। नाते । वार्ताहर ।

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 व्या जयंती सोहळ्यास काल सायंकाळपासूनच शिवभक्तांकडून उत्साहात सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती रायगड किल्ल्यासह संपूर्ण महाड तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. खांद्यावर भगवा ध्वज, हातात धगधगती शिवज्योती आणि मुखातून ङ्गजय भवानी, जय शिवाजीफ असा जयघोष करीत रायगड किल्ल्यावरून हजारो शिवप्रेमी आपल्या गावी रवाना झाले. बुधवारी मध्यरात्रीपासूनच शिवज्योती नेण्यासाठी शिवप्रेमींची किल्ल्यावर गर्दी उसळली होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजरा झालेल्या शिवजयंतीला शिवप्रेमींचा मोठा उत्साह दिसून आला. रायगडाहून माणगाव, मंडणगड, गोरेगाव, चिपळूण, खेड, पोलादपूर, पुणे, सातारा अशा विविध ठिकाणी शिवज्योती नेण्यात आल्या. आपल्या गावात शिवज्योती स्थापन करून त्या त्या ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्याची परंपरा आजही कायम आहे.

रायगडावरून आणलेल्या शिवज्योतींमुळे किल्ल्यावरील रस्ता तसेच शहरातील रस्ते भगवेमय झाले होते. अनेकजण दुचाकीवरून तसेच खांद्यावर भगवा ध्वज घेऊन आपापल्या गावी जाताना दिसत होते. अनेक वाहनांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते. लांब राहणारे शिवप्रेमी टेम्पोतून ढोल-ताशांसह गडावर शिवज्योती नेण्यासाठी आले होते. यात बाल शिवप्रेमी व महिलांचाही संख्याही मोठी होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जाणता राजा सामाजिक संस्थेने आयोजित किल्ले रायगड ते चुनाभट्टी-मुंबई शिवज्योती नेण्यात आली. महाड येथे कोकण कडा मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या शिवज्योतीचे स्वागत नातेखिंड येथे श्री शिवाजी स्मारक समितीच्या वतीने तर महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले.बुधवार दुपारपासूनच महाड माणगाव खेड दापोली श्रीवर्धन या परिसरातील शेकडो शिवभक्त राजधानी किल्ले रायगडावरून शिवजीत आणण्यासाठी मोठ्या संख्येने गडाकडे रवाना झाले आहेत. आज पहाटेपासूनच बुधवारी सायंकाळी गडावर गेलेले हे शिवभक्त बरोबर शिवज्योत व ढोल ताशांच्या गजरात नातेखिंडी येथील भगव्या चौकामध्ये तसेच महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून व तेथील स्वागत स्वीकारून आपल्या गावी आयोजित केलेल्या जयंती सोहळ्यास रवाना होत आहेत.

नातेखिंड येथील भगव्या चौकामध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक उत्सव समिती तर्फे शिवभक्तांचे व शिवज्योतीचे स्वागत करण्यात येत असून त्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे . स्मारक समिती स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल पुरोहित यांच्यासह शंभर पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते बुधवारपासूनच या सुरू असलेल्या स्वागत सोहळ्यासाठी खिंडीमध्ये तळ ठोकून बसले आहेत तर महाड शहरातील शिवजयंती उत्सव समितीमार्फत प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवज्योतींचे स्वागत श्रीफळ देऊन करण्यात येत आहे. सुमारे 500 पेक्षा जास्त शिवज्योती किल्ले रायगडावरून महाड पोलादपूर माणगाव श्रीवर्धन परिसरात रवाना झाल्याचे सांगण्यात आले आहे.

महाड शहरासह तालुक्यातील बहुतेक सर्व गावांतून शिवजयंतीची मिरवणूक व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे . चालू वर्षीचा शिवजयंती उत्सव आनंदात उत्साहात संपन्न व्हावा यासाठी पोलीस प्रशासनाने देखील चोख बंदोबस्त ठेवला असल्याचे सांगण्यात आले. एकूणच प्रतिवर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सवास किल्ले रायगडावर येणार्‍या शिवभक्तांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत असून आगामी काळात या सर्व बाबीं करता शासनाला वेगळी यंत्रणा सज्ज ठेवावी लागणार असल्याचे स्पष्ट होत आह

Exit mobile version