आठवडा बाजारात मोठी गर्दी

। सुतारवाडी । वार्ताहर ।

पावसाळ्यात साठवणुकीसाठी रविवारी भरणार्‍या कोलाडच्या आठवडा बाजारात तुफान गर्दी जाणवत आहे. गेल्या 49 वर्षांपासून कोलाड येथील आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस आठवडा बाजार भरतो. पूर्वी रस्त्याच्या दुतर्फा बाजार भरत असे. मात्र, जागेचा अपुरेपणा आणि सुरक्षेचा विचार करून आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस प्रशस्त जागेत रविवारचा आठवडा बाजार भरतो. प्रचंड उष्णता जाणवत असूनसुद्धा लहान मोठे व्यापारी आपली दुकाने थाटतात. तसेच, विविध तालुक्यातील ग्राहक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर येतात. या बाजारामुळे रोहाकडे जाणार्‍या रस्त्यावर प्रचंड गर्दी जाणवते. सुकट, बोंबील, कांदे, बटाटे, कडधान्य अशा मुबलक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असते.

Exit mobile version