वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

उद्या दि.29 रोजी होणाऱ्या वटपौर्णिमा उपवास आणि पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिलांनी शनिवार व रविवारी मुरूड शहरातील मुख्य बाजारात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती. यावेळी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पूजेचे साहित्य, फुले, फळे, हळद-कुंकू, अगरबत्ती, कापूर, दोरा, फणस, आळु, आवळा, परडी, पूजेची ताटे तसेच ओवसा करिता बांगड्या, दागिने व विविध वस्तू खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. फुलांच्या बाजारात मोगरा, जाई, गुलाब आणि झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असून, दरातही किंचित वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान, बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, व्यापाऱ्यांमधूनही समाधान व्यक्त करण्यात आले.

Exit mobile version