उकाडा झाला असह्य; सरोवरात पोहण्यासाठी तरुणांची लगबग


। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

दिवसें दिवस सूर्यनारायण आपले वृद्र रूप प्रगट करीत असल्याने या प्रखर उन्हामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या नदी, तलावाच्या ठीकाणी पोहण्याची गर्दी दाटून येत आहे. वाढत्या उष्णतेच्या तीव्रतेमुळे प्रत्येक जण हैराण झाले असून, या रणरणत्या उन्हाचा प्रत्येकाला सामना करावा लागत आहे. यामुळे दुपारी घराबाहेर जाणे अनेकजण टाळत आहेत. घरातील उकाडासुध्दा असह्य बनत चालला असल्याने शरीराला थंडावा मिळण्यासाठी या नदीतील थंड पाण्याचा आधार घेत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहायला मिळत आहे.

Exit mobile version