एव्हरेस्टवर कोंडी; दोनशे गिर्यारोहक पोहोचले

| काठमांडू | वृत्तसंस्था |

जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवर ट्रॅफिक जामच झाला होता. एकाचवेळी 200 गिर्यारोहक 8,790 मीटर उंच साऊथ समिट आणि हिलेरी स्टेपवर पोहोचले. 8,848 मीटर उंचीच्या या शिखरापासून माउंट एव्हरेस्ट 200 फूट दूर आहे. ये-जा वाढल्याने बर्फ खचला आणि दोन गिर्यारोहक हजारो फूट खाली पडून बर्फात गाडले गेले.

एव्हरेस्टवर चढाईसाठी सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंतच परवानगी होती. सर्वच गिर्यारोहक शिखरावर जाण्यासाठी धडपडत होते. प्रत्येक गिर्यारोहकाला शिखराव फक्त 2 मिनिटे थांबण्याची परवानगी मिळाली. सहसा एव्हरेस्टच्या शिखरावर गिर्यारोहकांना जास्तीत जास्त 10 मिनिटे दिली जातात. यामागे तीन कारणे आहेत. पहिले- अनेक गिर्यारोहक रांगेत असतात. दुसरे- इथे कधीही वातावरण खराब होते. बर्फाच्या वादळाची शक्यता असते. आणि तिसरे कारण- अधिक उंचीमुळे येथे ऑक्सिजनची कमतरता असते. गिर्यारोहक पाठीवर लादलेल्या ऑक्सिजन सिलिंडरमधून पुरवठ्यावर अवलंबून असतात. याच पुरवठ्यावर त्यांना परतायचेही असते. पायथ्याच्या तळावरील प्रमुख खीम लाल गौतम यांच्या माहितीनुसार यंदा विक्रमी 419 गिर्यारोहकांना परवाना दिला. त्यात 343 पुरुष आणि 76 महिला आहेत. यंदा 62 देशांच्या गिर्यारोहकांच्या 43 मोहिमा झाल्या. जूनच्या पहिल्या आठवड्यात या वर्षाची मोहीम संपेल. यंदा 29 भारतीयांनी एव्हरेस्ट गाठले. नेपाळ पर्यटन विभागाच्या माहितीनुसार गिर्यारोहकांशिवाय 181 शेरपाही एव्हरेस्ट चढाईच्या मोहीमेत सहभागी झाले होते.

Exit mobile version