| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या व विविध ठिकाणी सीएसआर फंडाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मदत करणाऱ्या विस्टा प्रोसेसेड फूड्स रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या महत्वाकांक्षी प्रकल्प रोटरी घनदाट जंगलांना 10 लाखाचा सीएसआर फंड जाहीर केला आहे. पनवेलकर नागरिकांच्या लोकसहभागाद्वारे पनवेल महानगर पालिका व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या घनदाट जंगल प्रकल्पास तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या अनुषंगाने प्रकल्पाचा तिसरा वर्धापन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला भुपेंदर सिंग, चंद्रशेखर सोमण, डॉ. गिरीश गुणे, माजी आ. बाळाराम पाटील, पनवेल महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, उपायुक्त विधाते, रुपाली माने, संतोष मराठे, नितीन ढमाले, चारू श्रोत्री उपस्थित होते.
रोटरी घनदाट जंगलला सीएसआर फंडाची मदत
