वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज

तहसीलदार घारे यांचे प्रतिपादन
। म्हसळा । वार्ताहर ।
भापट येथील साने गुरुजी बालभवन वाचनालय येथे तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ तहसीलदार समीर घारे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष समिर घारे यांनी सांगितले की, आजच्या पीढीला वाचन संस्कृतीची खुप आवश्यकता आहे आणि ती आजच्या पिढीने जोपासणे अत्यावश्यस्क आहे.
साने गुरुजी बालभवन वाचनालय भापट या वाचनालयाच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी तालुका स्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत एकुण 60 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत विजई झालेल्या विद्यार्थ्यांना तहसीलदार समिर घारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या होत्या. गट क्रमांक 1 श्रेयशी बालाजी माने प्रथम, प्रिया प्रमोद भायदे द्वितीय, स्वरीत उमाकांत गुंडरे तृतीय, श्रवण उमेश गिजे तृतीय, सेजल नामदेव नाक्ती उत्तेजनार्थ, वेदांत राजेश पाडावे उत्तेजनार्थ, गट क्रमांक 2 रोशनी रामचंद्र कुवारे प्रथम, प्रतिक संतोष जाधव द्वितीय, निकिता विनोद जोशी तृतीय, गौरव गणेश जाधव उत्तेजनार्थ, गट क्रमांक 3 अर्चना रविंद्र येलवे प्रथम, योगेश यशवंत मेंदाडकर द्वितीय, रुपेश दिपक गमरे तृतीय, नामदेव बाळू पवार तृतीय, साईराज दत्तात्रय कांबळे उत्तेजनार्थ, मेघश्याम हरिश्‍चंद्र लोणशीकर उत्तेजनार्थ, विशेष सहभाग तनिषा दिपक पाटील, दिया जयसिंग बेटकर, मनस्वी सुनील येले, आरुषी सुनील भोसले यांना प्रत्येकी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

Exit mobile version