इंडोनेशियाच्या पर्पल राईसची पनवेलमध्ये लागवड

मिनेश गाडगीळ यांचा शेतीप्रयोग

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील गुळसुंदे गावातील प्रगतीशील शेतकरी, कृषीभूषण मिनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतामध्ये पर्पल राईस म्हणजेच इंडोनेशियातील थायोमल्ली जस्मीन भाताची लागवड केली आहे. हा तांदूळ विशेषतः लहान मुलांसाठी उपयुक्त आहे.

गुळसुंदे येथील प्रगतीशील शेतकरी महाराष्ट्र राज्य कृषीभूषण मिनेश गाडगीळ यांनी आपल्या शेतामध्ये विविध प्रयोग करुन आतापर्यंत अनेक नाविन्यपूर्ण उत्पादने घेतलेली आहेत, ज्यामध्ये ड्रॅगनफ्रुट, स्ट्रॉबेरी, लाल तांदूळ, काळा तांदूळ, बासमती, आंबेमोहर, डायबेटीससाठीचा आरएनआर तांदूळ, कलर कलिंगड व मस्कमेलन इत्यादींचा समावेश आहे.

आपल्याकडे यशस्वी झालेले उत्पादन इतरही परिसरातील शेतकर्‍यांनी घ्यावे यासाठी त्यांचा सतत प्रयत्न चालू असतो, जेणेकरुन पारंपरिक पिकांबरोबर नाविन्यपूर्ण उत्पादने घेतल्यास शेतकर्‍यांचा अर्थिक स्तर उंचावेल. यावर्षी मिनेश गाडगीळ यांनी निळा तांदूळ इंडोनेशियातील, थायोमल्ली जस्मीन राईस जो लहान मुलांसाठी विशेष करुन उपयुक्त व परपल राईस लेबेनिया येथील आपल्या शेतात लागवड केलेला आहे. साधारण 30 ते 40 क्विंटल एकरी उत्पादन देणार्‍या या जाती असून, अनेक गुणधर्म या तांदळात आढळून येतात. ज्यामध्ये कमी ग्लॅयसेमिक इन्डेक्स, अ‍ॅन्टी ऑक्सीडन्ट इफेक्ट, अ‍ॅन्टी कॅन्सर इफेक्ट, विशेष प्रकारचा सुवास, शिजण्यासाठी कमी कालावधी इत्यादी व नैसर्गिक पिग्मेंटमुळे येणार्‍या विविध रंगांमुळे ग्राहकांची यास विशेष पसंती असल्याचे निदर्शनास आले आहे. वरील तांदूळ हा कोकणात पहिल्यांदाच घेतला गेला असून, पर्पल राईस हा राज्यात पहिल्यांदाच तयार होइल व पीक तयार झाल्यानंतर वरील जातींचे बियाणे तयार करुन ते आजूबाजूच्या परिसरातील शेतकर्‍यांना आपण उपलब्ध करुन देऊ, असा आशावाद मिनेश गाडगीळ यांनी व्यक्त केला.

Exit mobile version