आश्रम शाळेत फुलवली परसबाग

| नेरळ । वार्ताहर ।

कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मला निकेतन यांचे मार्फत किचन गार्डनच्या माध्यमातून स्थानिक भाज्यांची लागवड करून आदिवासी मुलामुलींची पोषण पातली योजना राबविली जात आहे. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत शासकीय आश्रमशाळा चाफेवाडी येथील परिसरात परसबाग तयार करण्यात आली आहे. या परसबाग मध्ये पालक, मुळा, माठ, भेंडी, गवार आदी पालेभाज्यांची लागवड केली आहे. सदर परसबाग मध्ये तयार झालेली भाजी उपलब्धतेनुसार आश्रम शाळेतील निवासी विद्यार्थ्याना जेवणामध्ये दिली जाते.

निर्मला निकेतन रिसर्च युनिटने या योजने अंतर्गत चाफेवाडी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांची वजन, उंची, बी.एम. आय तपासणे, पोषण तत्वाबद्दल माहिती देणे, पोषण तत्व असलेल्या भाज्याची रेसिपी बनवण्याचे प्रात्यक्षिक, रानभाज्या माहिती आणि जेवणातील उपयोग आसे उपक्रम राबवले आहेत. सदर उपक्रम कॉलेज ऑफ होम सायन्सच्या व्यवस्थापिका नोएला डायस यांचे मार्गदर्शन आणि प्रकल्प सशोधक डॉ. रत्नाराजे थार, रिसर्च फिल्ड वर्कर तेजेश दाभणे कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मला निकेतन रिसर्च सेंटर टीम यांच्या माध्यमातून सुरू असून चाफेवाडी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एम. पी.पाटील हे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. शाळेत किचन गार्डन या उपक्रमा अंतर्गत पालक, मुळा, कोथिंबीर या पालेभाज्या तसेच भेंडी, गवार, चवळी या भाज्यांची लागवड केली आहे. किचन गार्डन उपक्रम राबविन्यासाठी आमच्या शाळेची निवड केल्याबद्दल प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांचे सहकार्य आश्रमशाळांना लाभत आहेत.

विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शेती, बागकाम यांची आवड निर्माण व्हावी. तसेच आहारातील भाज्यांचे महत्त्व समजावे या दृष्टीने महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग आणि कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मला निकेतन चर्चगेट यांच्या सहभागातून साकारला जात आहे.

एम पी पाटील, मुख्याध्यापक
चाफेवाडी शासकीय आश्रमशाळा
Exit mobile version