कुंभे माळरानावर पांढर्‍या कांद्याची शेती

सलग दुसर्‍या वर्षी यश्स्वी प्रयोग

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील प्रगत शेतकरी अंकुश शेळके यांनी सलग दुसर्‍या वर्षी पांढर्‍या कांद्यांची शेती केली आहे. गतवर्षी कर्जतच्या कुंभे गावातील माळरानावर कांद्याची यशस्वी शेती करणारे प्रगत शेतकरी शेळके यांच्या या वेगळ्या शेतीची चर्चा सुरु झाली आहे.

उल्हास नदीच्या जवळ कुंभे गाव असून तेथे नेरळ गावाचे अंकुश शेळके यांची शेती आहे. त्या शेतीमधून शेळके कुटुंब अनेक वर्षे मोगर्‍याची शेती करायचे. दररोज काही शेकडा किलो मोगरा कल्याण बाजारात विक्री करणार्‍या शेळके यांनी तेथे वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे लावली आहेत. पावसाळ्यात भाताची प्रगत शेती आणि आता उन्हळ्यात पांढर्‍या कांद्याची शेती ते करीत आहेत. पांढरा कांदा हा गुणकारी असल्यामुळे अलिबाग येथील पांढरा कांदा अधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे शेळके यांनी मागील वर्षपासून पांढर्‍या कांद्याची शेती केली होती. गतवर्षी कृषी विभागाच्या अनेक अधिकार्‍यांनी शेळके यांच्या या प्रयत्नाचे कौतुक केले होते.

अलिबाग चौल येथील आपल्या मित्राच्या शेतातील पांढर्‍या कांद्याचे रोप आणून यांनी हि शेती केली आहे. या शेतीसाठी सहा गुंठे क्षेत्रात कांद्यांची रोपे लावण्यात आली. कांद्याच्या शेतीला पाणी घालणे आणि मशागत करण्याची कामे स्वतः करीत असतात. मागील वर्षी कांद्यांची शेती बहरात आली आहे.

Exit mobile version