• Login
Wednesday, May 18, 2022
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-Paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-Paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय संपादकीय लेख

अलिबागची सांस्कृतिक आठवण भाऊ सिनकर

Krushival by Krushival
July 12, 2021
in संपादकीय लेख
0 0
0
अलिबागची सांस्कृतिक आठवण भाऊ सिनकर
0
SHARES
2.2k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

तत्कालीन परिस्थितीत मुंबईमधून प्रसिद्ध होणार्‍या दै. लोकसत्ता, दै. नवशक्ती अशा प्रसिद्ध वृत्तपत्रातून जिल्ह्यांतील प्रतिनिधी म्हणून भाऊ सिनकरांनी काम केले. रायगड जिल्ह्यात अनेक वर्षे पत्रकारितेत कार्यरत असलेले व स्वत:चे वर्तमानपत्र असलेल्या भाऊ सिनकरांचा जन्म अलिबाग तालुक्यांतील पोयनाड जवळील बांधण या गावी 19 डिसेंबर 1927 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण अलिबागेत झाले. पत्रकारितेबरोबरच, नाट्य व्यवसाय, समाजकार्य, राजकारण, सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातही ते कार्यरत असत. आपल्या उल्लेखनीय कामामुळे सर्वच क्षेत्रात त्यांच्या चांगल्याच मैत्रीपूर्ण ओळखीमुळे कोणाबद्दल कोणताही भेदभाव न करणारे भाऊ पायी चालत अगर आपल्या जुन्या सायकलवरुन सफेद शर्ट, सफेद पॅन्ट परिधान करुन खांद्यावरुन ङ्गशबनमम झोळी अडकवून जाणारे भाऊ हे अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात.
भाऊंना मुळातच लहानापासून चित्रकलेची फार आवड असल्याने त्यांनी 1947 ते 1951 या कालावधीमध्ये मुंबईतील प्रसिद्ध अशा व्ही.जे.टी.आय.मध्ये ङ्गव्ही निंगफ या विषयांचे शिक्षण घेतले. शालेय जीवनात त्यांनी 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. राष्ट्रसेवा दलाचा आदर्श सैनिक म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनात कामास सुरुवात केली. तर 1956 साली पत्रकारितेची सुरुवात केली. पत्रकारिता करीत असताना त्यांना छायाचित्र काढण्याचा छंद असल्याने व त्यात त्यांनी चांगल्या प्रकारे प्राविण्य दाखविल्यामुळेच शासनांकडून त्यांना ङ्गवृत्तपत्रफ छायाचित्रकार म्हणून मान्यता मिळाली. सन 1978 साली मुंबई मराठी पत्रकार संघाने घेतलेल्या पत्रकारिता स्पर्धेतील ग्रामीण भागातील उत्कृष्ट वार्तापत्राचे डहाणूकर पारितोषिक त्यांना प्रथम मिळाले. त्यामुळेच तत्कालीन परिस्थितीत भाऊंचे नाव जिल्ह्यात सर्वदूर सर्वश्रुत झाले. त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत अनेक पारितोषिके त्यांना मिळाली, अनेक पुरस्कार मिळाले. अनेक शैक्षणिक, सामाजिक, व पत्रकारिता क्षेत्रात पतसंस्थामध्ये ते सदस्य ते पदाधिकारी म्हणून कार्यरत होेते. मुळचे ते राजकीय क्षेत्रात प्रजासमाजवादी पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. सन 1967 साली त्यांना अलिबाग नगरपरिषदेची नगरसेवकपदाची निवडणूक लढवून ते विजयी झाले. 1967 ते 1972 या कालावधीत ते नगरसेवक म्हणून कार्यरत होते.
पुणे मुंबईतील प्रमुख वर्तमानपत्रातून प्रतिनिधी म्हणून काम करीत असतांनाच आपल्या जिल्ह्यांतील विविध प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी आपल्या स्वत:च्या मालकीचे साप्ताहिक असावे म्हणून 1 ऑक्टोबर 1979 रोजी भाऊंनी ङ्गसा.कुलाबा दर्पणफ चालू केले. कोणाचेही आर्थिक पाठबळ व पाठींबा नसतांना त्यांनी आत्मबळावर स्वत:च्या हिंमतीवर 6 जानेवारी 1988 रोजी साप्ताहिक कुलाबादर्पणचे सायं दैनिक म्हणून सुरु केले. स्वत:ची प्रेस नसतांना वर्तमान पत्राचे छपाईचे काम ते दुसर्‍या प्रेसमधून करुन घेत असत. त्यावेळी वाचनीय मजकुरामुळे अल्पावधीतच ङ्गकुलाबा दर्पणफ लोकप्रिय केला. त्यानंतर त्यांनी सकाळच्या प्रहरी ङ्गकुलाबा दर्पणफ दैनिक म्हणून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. अलिकडचे बरेच तरुण वार्ताहर, पत्रकार दै. कुलाबा दर्पणच्या माध्यमांतून भाऊंच्या पत्रकार विद्यापीठातून शिक्षण घेतलेले आहेत. त्यामुळेच जिल्ह्यांतील सारेच पत्रकार त्यांना गुरुस्थानी मानत. पत्रकारीता करीत असतांना भाऊंना बर्‍याच वेळा, बर्‍या वाईट प्रसंगाबरोबरच कोर्ट कचेर्‍या कारवांईनाही सामोरे जावे लागत असे, पण एक खांबी तंबुप्रमाणे हे सर्व सहन करीत त्यांनी त्याच्याशी मुकाबला केला, व आपली पत्रकारिता यशस्वी केली.
अलिबागच्या सांस्कृतिक क्षेत्रातही भाऊ अग्रेसर होते. पत्रकारितेप्रमाणेच उमदे व्यक्तीमत्व असलेल्या भाऊंनी अलिबागच्या नाट्यरसिकांची नाटक पाहण्याची भूग भागविली. वेधशाळेमुळे अलिबागेत वीज येण्यात अडचणी असल्यामुळे रंगमंचावरील नाटके ही पेट्रोमेक्स बत्तीच्या प्रकाशात व्हायची. सुरुवातीस झापाच्या थिएटरमधून रामनाथ नजिक शंकर अण्णांच्या खारटात, तसेच जुन्या भाजीमार्केटजवळ ङ्गकनकेश्‍वरफ नाट्य थिएटर, जोगळेकर नाक्यावरील नाईक वाडींतील झापाच्या खुल्या नाट्यगृहात नाटके व्हायची. भाऊंनी मुंबईतील मुंबई मराठी साहित्य संघात केलेल्या कामाच्या अनुभवानी संघात केलेल्या कामाच्या अनुभवाने आपल्या अलिबागेतही नाट्यगृह सुरु करावे अशी कल्पना त्यांना त्यावेळी स्फुरली. तत्कालीन परिस्थितीत भाऊंच्या सहकार्याने अलिबागेत नाट्यप्रयोग करावा असे ङ्गनाट्यमंदारचेफ संस्थापक, नाट्यनिर्माते राजा राम शिंदे यांना वाटल्याने त्यांनी अलिबागेत नाट्यप्रयोग करण्याचे ठरविले. पण बर्‍याच संस्थांबरोबर संपर्क साधूनही रंगमंचाची व्यवस्था न झाल्याने नाट्यप्रयोग होऊ शकला नाही याची खंत भाऊंच्या मनाला लागून राहिली, त्यानंतर त्यांनी प्रयत्न करुन खुल्या नाट्यगृह उभारणीसाठी प्रयत्न केले. ध्वनी विस्तार योजना, प्रकाश योजना आदीची त्यांना अद्ययावत माहिती होती. त्यांनी ङ्गरंगवैभवफ नावाची स्वत:ची संस्था सुरु करुन नाट्य-साहित्याची, जागेची व बाहेरील नाट्यसंस्थेस लागणारी सर्व प्रकारची लागणारी मदत देण्याचे काम जिद्दीने सुरु केले. यातही त्यांना ङ्गश्रीरंगमंचफ नावाने खुले नाट्यगृह सुरु केले.
बाळ कोल्हटकरांच्या ङ्गवाहतो ही दुर्वाची जुडीफ या नाटकाने श्री रंगमंचाचे उद्घाटन केले.
व्यवसाय नवीन, जागा अपुरी, मुंबईच्या नावाजलेल्या गाजलेल्या संस्थेचा प्रयोग. पहिल्याच प्रयोगाला मुख्यपात्रे वेळेवर येऊ शकली नाहीत, त्यातच काही हितचिंतक लोक फजिती बघण्यास आलेले. परंतु संस्थेचा पहिलाच उपक्रम हा अंगारकी चतुर्थीला होता, त्यामुळे अंगारकी चतुर्थीला गणेशाला ङ्गदुवाची जुडीफ वाहिल्याने नाटकाचा प्रयोग पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे विघ्न आले नाही.
तथापि अपुर्‍या जागेची खंत मनाला लागून राहिल्याने नाट्यगृहासाठी मोठी जागा मिळविण्याचे प्रयत्न भाऊंनी केले त्यात त्यांना यश आले, त्यावेळी श्रीमंत नानासाहेब बिवलकरांनी आपल्या वाड्यांतील जागा भाऊंना दिली. तेथे त्यांनी झापाचे अद्ययावत सर्व साधन, सुखसोयींनी असे नाट्यगृह उभे केले. तत्कालीन जिल्हाधिकारी रा.ग. गुप्ते यांच्या हस्ते नाट्यगृहाचे उद्घाटन करणात येऊन सिद्धराज कलामंदिर या नावाने खुले नाट्यगृह सुरु झाले. ङ्गललित कला दर्शनफ या नामवंत नाट्यसंस्थेच्या ङ्गजय-जय गौरी शंकर नाटकाचा प्रयोय शुभारंभ म्हणून झाला. या कलामंदिरामुळे अलिबागेतील जनतेचे खुरटलेले सांस्कृतिक जीवन जोमाने सुरु झाले, नाट्यरसिकांची मनोरंजनाची सोय होऊन, नाटक पाहण्याची भूक भागवली जाऊ लागली. पुढील काळात भाऊंचे हे नाट्यगृह अलिबागेतच नव्हे तर तत्कालीन कुलाबा जिल्ह्याला भूषणावह ठरले.
नाटक आणि राजकारण या मराठी माणसाच्या दोन आवडी, विशेषत: कोकणांतील माणसाला नाटकाचे अति प्रेम, अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे सुशिक्षितांची मोठी लोकसंख्या त्यावेळी त्यांची नाट्यविषयक सांस्कृतिक गरज कोणी भागविली असेल, तर ङ्गसिद्धराज कलामंदिरच्या माध्यमांतून, ङ्गरंगवैभवफ या संस्थेने भाऊ सिनकरांनी केवळ दोन वर्षच नाही. तर पुरी पंचवीस तीस वर्षे. पुणे मुंबईच्या नामवंत नाट्यसंस्थांची गाजलेली नाटके ङ्गसिद्धराजफ मुळे नाट्य रसिकांना पहावयांस मिळाली. पण पुढील काळात अलिबाग शहराचे आधुनिकीकरण होत गेले. रस्ता रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. एस.टी. स्थानकाकडून, समुद्राकडे जाण्यासाठी ङ्गठोसर वाडीतूनफ नव्याने रस्ता करण्यात आला. नवीन रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बिवलकर वाड्यांतील भाऊंचे सिद्धराज कलामंदिर बंद झाले. अलिबागची नाट्यगंगाच लुप्त झाली. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याजवळ असणे तेव्हा तिची किंमत आपल्याला कळत नाही, जेव्हा ती नसते तेव्हा तिची किंमत कळते. भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांमुळे जगभराची कोणतीही बातमी, वृत्त घटना क्षणात आपल्या पर्यंत पोहचते. दूरदर्शनच्या येण्याअगोदर दैनिक साप्ताहिक हीच प्रसार प्रसिद्धी माध्यमे होती. काही वर्षाच्या अगोदर मागे वळून पाहिले तर तेव्हांच्या कुलाबा जिल्ह्यात दैनिक तर नव्हतेच, वाचनासाठी साप्ताहिकांची संख्याही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती. अशा काळामध्ये दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून रायगडात ज्यांचे नाव सर्वतोमुखी झाले होते ते अलिबागेतील ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ नाट्यव्यावसायिक रघुनाथ विश्‍वनाथ तथा भाऊ सिनकर

Related

Tags: bhau sinkareditorial articlemarathi newsmarathi newspapernews
Krushival

Krushival

Related Posts

खाजगीकरणाची थेट खिशाला झळ !
संपादकीय

खाजगीकरणाची थेट खिशाला झळ !

May 18, 2022
नगरपंचायतीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी
संपादकीय

 उदयपुरचे काँग्रेस चिंतन शिबिर

May 16, 2022
उन्हाची दाहकता शहरांसाठी चिंताजनक
संपादकीय

उन्हाची दाहकता शहरांसाठी चिंताजनक

May 13, 2022
‘संतूरचे राजदूत’ हरपले
संपादकीय

‘संतूरचे राजदूत’ हरपले

May 12, 2022
आरक्षणाचा प्रश्‍न कुजवत ठेवण्याचा डाव
संपादकीय

आरक्षणाचा प्रश्‍न कुजवत ठेवण्याचा डाव

May 10, 2022
चित्रा… यशाची शिखरं अशीच गाठत जा!
संपादकीय

चित्रा… यशाची शिखरं अशीच गाठत जा!

May 8, 2022

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2022
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Archives

  • May 2022
  • April 2022
  • March 2022
  • February 2022
  • January 2022
  • December 2021
  • November 2021
  • October 2021
  • September 2021
  • August 2021
  • July 2021
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • March 2021

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Leaftech.in

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • कोंकण
    • ठाणे
    • पालघर
    • रत्नागिरी
    • सिंधुदुर्ग
  • राज्यातून
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • पंढरपूर
    • पुणे
    • बेळगाव
    • मुंबई
    • विजापूर
    • सांगली
    • सातारा
    • सोलापूर
  • रायगड
    • अलिबाग
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • पनवेल
    • पेण
    • पोलादपूर
    • महाड
    • माणगाव
    • मुरुड
    • म्हसळा
    • रोहा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • देश
  • विदेश
  • शेती
  • क्रीडा
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
  • कलासक्त
  • मोहोर
  • E-Paper
  • Shopping
  • KV News
  • Technology
  • खारा-वारा
  • Poll

Designed and Developed by Leaftech.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?